महा लोकसंवाद न्यूज(भुसावळ)
आज दिनांक 1/9/2025 रोजी
भुसावळ येथील तहसिलदार श्रीमती नीता लबडे मॅडम यांना भ्रष्टाचार विरोधी अक्रोश संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले
निवेदनामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की
भुसावळ तालुक्यामधील गरीब लाभार्थी त्यांना रेशन कार्ड साठी पाच-सहा महिने होऊन सुद्धा रेशन कार्ड मिळत नाही जे जुने रेशन कार्ड आहे त्यांना बारा अंकी नंबर मिळत नाही ज्यांना बारा अंकी नंबर मिळाला आहे त्यांना रेशनचे स्वस्त धान्य मिळत नाही अशा एक ना अनेक समस्यांमुळे गरीब लोकांचे हाल होत असून या समस्या तात्काळ सोडवुन लाभार्थ्यांना नवीन रेशन कार्ड व बारा अंकी नंबर ताबडतोब देण्यात यावा
ज्यांना बारा अंकी नंबर मिळाला आहे त्यांना तात्काळ स्वस्त धान्य मिळावे तसेच महसूल विभागातील कुळ कायदा विभागात अनेक प्रकरणे प्रलंबित असून तात्काळ सोडवण्यात यावे आमच्या मागण्या तात्काळ पूर्ण कराव्या मागण्या पूर्ण झाल्यास संघटनेच्या वतीने भुसावळ तहसील कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय व मंत्रालयासमोर उपोषण करण्यात येईल असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आलेला आहे
या मागण्यासाठी आज भ्रष्टाचारी विरोधी आक्रोश संघटनेच्या वतीने भुसावळच्या तहसीलदार नीता लबडे मॅडम यांनानिवेदन देण्यात आले निवेदन देतेवेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री रामेश्वर लोहार पत्रकार संपादक तसेच हिंदी मराठी पत्रकार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश सुरवाडे सामाजिक कार्यकर्ते सुरेश जोहरे ज्ञानदेव पाटील असे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते

No comments:
Post a Comment