मलकापूर नगराध्यक्ष पदावर काँग्रेसचे अतिक जवारीवाले विजयी भाजपचे मिलिंद डवले पराभूत - MHL News

Breaking

Monday, 22 December 2025

मलकापूर नगराध्यक्ष पदावर काँग्रेसचे अतिक जवारीवाले विजयी भाजपचे मिलिंद डवले पराभूत



मलकापूर 

लोकशाहीचा उत्सव असलेल्या मलकापूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक अनुषंगाने  २ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली आहे होती. या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे घोषित करण्यात आला  असून काँग्रेसचे उमेदवार अतिक उर-रहमान जवारीवाले यांनी भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मिलिंद महादेवराव डवले यांचा दारुण पराभव करून दणदणीत विजय मिळवला आहे. 2 डिसेंबर रोजी झालेल्या नगरपरिषद निवडणुकीचा हा निकाल असून शहरातील राजकारणाला या निकालामुळे नवी कलाटणी मिळाली आहे.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या मतमोजणी नुसार काँग्रेसचे अतिक जवारीवाले यांना तब्बल 23,614 मते मिळाली, तर भाजपचे मिलिंद डवले यांना 12,630 मते मिळाली. इतर उमेदवारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे प्रसाद नारायणराव जाधव यांना 4,515 मते, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे अनिल त्रंबक झोपे यांना 274 मते, कमरुन बी शेख बशीर यांना 115, अरविंद जानकीराम पाटील यांना 259, आशिष माहूरकर यांना 75, गजानन परशुराम मिरगे यांना 788, सय्यद अजगर रहमान यांना 46, तर अ.समद अ.नजीर 133, यांना मते मिळाली. याशिवाय NOTA ला 250 मतदारांनी पसंती दर्शवली.

नगरपरिषद रचनेत काँग्रेसचा स्पष्ट प्रभाव दिसून आला असून एकूण 30 वार्डांतून काँग्रेसचे 14 नगरसेवक निवडून आले आहेत. तर भाजपचे 6, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) 4, एमआयएम 3, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) 1, आणि अपक्ष 2 उमेदवार विजयी झाले आहेत.

या निकालानंतर शहरात आनंदोत्सवाचे वातावरण असून काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला. तर शहराच्या पुढील विकासाची मोठी जबाबदारी नव्या नगराध्यक्षांवर येऊन ठेपली आहे. तर भारतीय जनता पार्टीकडून 27,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 24, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार )17, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार ) 7, शिवसेना (शिंदे) गट 9, शिवसेना (उबाठा) 7, एम आय एम 9 असे नगरसेवक पदाकरिता एकूण पक्षाचे  95 उमेदवार तर अपक्ष 36 असे एकूण 131  उमेदवार रिंगणात होते.

 त्यापैकी मलकापूर नगरपरिषद मध्ये 

काँग्रेस 14 

भाजप  6

 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार ) घडी   4

 (एम आय एम ) पतंग  3

 (शिवसेना उबाठा)  मशाल   1

अपक्ष 2 अशी पक्षनिहाय संख्याबळ आहे.



यावेळी मलकापूर नगरपरिषद निवडणुकीमध्ये  एकूण ५७ हजार ६६५ मतदार आहेत. त्यापैकी पुरुष 29264 मतदार, आणि स्त्रिया  28397मतदार व इतर 4 इतके मतदार आहे निवडणूक प्रक्रिया शांततेत व भयमुक्त पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे, तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी महेश रामगुंडे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संजय केदार यांच्या मार्गदर्शनात प्रशासन सज्ज झालेले होते.

मलकापूर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जनतेतून नगराध्यक्ष पदाकरिता दहा उमेदवारांसह १५ प्रभागातून १३१ उमेदवार नगरसेवक पदाकरिता निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.


No comments:

Post a Comment