मोताळा : ११ वर्षीय मुलगी शाळा सुटल्यानंतर पायी घराकडे येत असतांना तिला भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने जखमी केल्याची घटना कोथळी येथील सरकारी दवाखान्यासमोर २७डिसें. रोजी सकाळी ११ वाजे दरम्यान घडली.
याबाबत सविस्तर असे की, फिर्यादी परविनबी गुलाबशाह वय (वय २९) रा. कोथळी यांनी बोराखेडी पोस्टेला फिर्याद दिली की, त्यांची मुलगी आफरिनबी गुलाबशाह (वय ११) ही २७डिसें. रोजी तिची शाळा
सुटल्यानंतर पायी घराकडे येत असतांना चालक शेख अनिस शे. करामत रा. कोथळी याने त्याच्या ताब्यातील वाहन क्रमांक MH.05 BH.7118 भरधाव वेगाने चालवून फिर्यादीचे मुलीस धडक देवून जखमी केले. अशा फिर्यादी वरुन बोराखेडी पोलिसांनी चालक शे. अनिस शे. करामत याचे विरुद्ध कलम २८१, १२५ (अ) भा. न्या. सं. २०२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास अशोक आडोकार व श्रीकांत चिटवार हे करीत आहे
.jpg)
No comments:
Post a Comment