जिल्हा कृषि अधीक्षक म्हणून वरवट बकालचे डाबरे रूजू - MHL News

Breaking

Tuesday, 30 December 2025

जिल्हा कृषि अधीक्षक म्हणून वरवट बकालचे डाबरे रूजू



 प्रतिनिधी

वरवट बकाल बुलढाणा जिल्ह्यातील कृषी विभागातील खडानखडा माहिती असणारे विशेष म्हणजे जिल्ह्यात शेवटच्या टोकावर असलेल्या संग्रामपूर तालुक्यातील मुख्य गाव वरवट बकाल येथील शेतकरी कुटुंबातील संतोष गंगाराम डाबरे हे जिल्हा कृषी अधीक्षक म्हणून रूजू झाले आहेत.

जलसंधारण, शेतकरी प्रशिक्षण शेतकऱ्यांचे अभ्यास दौरे जिल्ह्यामध्ये पिकाचे विविधकरण करणे, संरक्षित शेती फळबाग लागवड आदीसह शेतकऱ्यांसाठी कृषी मेळावे व शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करणे आदीसह अनेक कामात त्यांनी आघाडी होती, त्यामुळे शेतकरी हरित क्रांतीकडे वळला होता. शेतकऱ्यांना शेतीत वाव मिळावा म्हणून अनेक नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब त्यांनी शेतकऱ्यांना संगीतला अनेक कषी मेळावा

त्यांनी घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शनाचा लाभ मिळाला. २००४ पासून संतोष डाबरे हे कृषी विभागात रूजू झाल्यापासून सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्यांनी कृषी विभागाच्या अनेक योजनेच्या प्रवाहात आणले सुरवातीला त्यांची नेमणूक उपविभागीय कृषी अधिकारी वर्धा तिथे ४ ते साडेचार वर्ष झाल्यानंतर बुलढाणा येथे उपविभागीय कृषी अधिकारी बुलढाणा म्हणून काम पाहिलेनंतर कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, भंडारा येथे काम पाहिले. तसेच यवतमाळ येथे प्रकल्प संचालक आत्मा तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी म्हणून काम पाहले. तर आता त्यांची पुन्हा घरवापशी झाली आहे. बुलढाणाया स्वजिल्ह्यात बदली होऊन रूजू झाल्याने निश्चितच शेतकऱ्यांना फायदा मिळणार आहे. बुलढाणा जिल्हा कृषी अधीक्षक पदाचा कार्यभार घेतल्याचे त्यांनी  सांगितले.

No comments:

Post a Comment