लोनवाडी भुसावळ मुक्कामी बस सेवा पुन्हा सुरू करावी. भ्रष्टाचार विरोधी आक्रोश संघटनेची मागणी. - MHL News

Breaking

Thursday, 18 December 2025

लोनवाडी भुसावळ मुक्कामी बस सेवा पुन्हा सुरू करावी. भ्रष्टाचार विरोधी आक्रोश संघटनेची मागणी.

 


जळगाव - भ्रष्टाचार विरोधी आक्रोश संघटनेचे जळगाव जिल्हा अध्यक्ष श्री रामेश्वर लोहार यांनी जिल्हा परिवहन महामंडळ प्रमुख यांना दिले निवेदन 


याबाबत सविस्तर माहिती अशी की गेल्या 50 वर्षापासून सुरू असलेली लोनवाडी भुसावळ मुक्कामी बस सुरू करावी कारण गेल्या कोरोना काळापासून ही बस बंद करण्यात आलेली आहे बस बंद असल्यामुळे हजारो प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे लोणवाडी सह जामठी येवती शेलवड मुक्तळ सुरवाडे मानमोडी शिदी मोंढाळा कुरा पानाचे चोरवड इत्यादी गावच्या लोकांना ह्या बच्चा फायदा होत होता बस बंद असल्यामुळे विविध कामानिमित्त जसे की दवाखाना शाळा कॉलेज जाणाऱ्या विद्यार्थी वैद्यकीय उपचारासाठी जाणाऱ्या प्रवाशांचे अतोनात हाल होत आहे तरी परिवहन मंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी लक्ष घालून सहा वाजून तीस मिनिटांनी संध्याकाळी सुटणारी बस ही त्वरित सुरू करावी 


यासाठी संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष विठ्ठल भाऊ व्हॅनमारे साहेब ज्यांच्या मार्गदर्शनाने व शेख गुलाब मामू महाराष्ट्र कार्याध्यक्ष व संघटनेचे जिल्हा कार्यकारी सदस्य येणारे एका महिन्याच्या आत भुसावळ लोणवाडी बस पुन्हा सुरू न झाल्यास संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हाध्यक्ष रामेश्वर लोहार यांनी दिला आहे

No comments:

Post a Comment