संत गाडगेबाबा नगरपालिका दवाखान्याचे स्थलांतर थांबवा अन्यथा रिपब्लिकन सेनेचा वतीने तीव्र आंदोलन - MHL News

Breaking

Friday, 23 January 2026

संत गाडगेबाबा नगरपालिका दवाखान्याचे स्थलांतर थांबवा अन्यथा रिपब्लिकन सेनेचा वतीने तीव्र आंदोलन

 


विनोद सोनवणे जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन सेना


भुसावळ: प्रतिनिधी भुसावळ नगरपालिकेतील सत्तांतरानंतर सध्या सत्ताधारी राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि भाजप यांच्यात कुरघोड्यांचे राजकारण रंगले आहे. मात्र, या राजकीय संघर्षात जनतेच्या आरोग्याशी खेळू नये. शहराचा विस्तार आणि गोरगरीब जनतेची सोय पाहता, मध्यवर्ती भागात असलेला 'संत गाडगेबाबा नगरपालिका रुग्णालय' कोणत्याही परिस्थितीत इतरत्र स्थलांतरित करू नये, रुग्णालयाची झालेली दुरवस्था दुर करुन उपचारासाठी दाखल रुग्णांना मोफत वैद्यकीय साधने व प्रशिक्षित डॉक्टरांची व्यवस्था करावी अशी आक्रमक भूमिका रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, जिल्हा नेते दिनेश इखारे,अरुण तायडे महिला सेना जिल्हाध्यक्षा वंदनाताई सोनवणे यांनी पत्रकार परिषदेद्वारे मांडली आहे.


नगरपालिका प्रशासनाने जनहित लक्षात न घेता निव्वळ नगरपालिका सभागृह नाही व नगरसेवक यांना बसण्यासाठी जागा नाही याकरिता हा दवाखाना हलवण्याचा घाट घातला असून,या निर्णयाचा रिपब्लिकन सेनेने तीव्र निषेध केला आहे.


स्थलांतरास विरोधाची प्रमुख कारणे: सध्या सुरू असलेल्या नगरपालिकेमध्ये सभागृह व इतर व्यवस्था होऊ शकते 

सध्याचा दवाखाना शहराच्या मध्यवर्ती भागात असल्याने सर्वसामान्य रुग्णांना तिथे पोहोचणे सोपे आहे. नवीन जागा लांब असल्याने रुग्णांना प्रवासाचा नाहक त्रास होईल.

दवाखाना लांब नेल्यास गोरगरिबांना आर्थिक फटका बसणार व त्यांना रिक्षा प्रवासासाठी अतिरिक्त पैसे खर्च करावे लागतील.

आपत्कालीन परिस्थितीत सध्याचा दवाखाना जवळ असल्याने रुग्णांना तातडीने उपचार मिळतात. स्थलांतरामुळे ही महत्त्वाची सुविधा हिरावली जाईल. लांबच्या अंतरामुळे वृद्ध रुग्णांना चालत जाणे किंवा वारंवार प्रवास करणे शक्य होणार नाही.

प्रशासकीय कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल

भुसावळ ही 'अ' वर्ग नगरपालिका असतानाही शहरात १० ते १५ दिवसांआड पाणीपुरवठा होतो


रेल्वे परिसरातील अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आजही प्रलंबित आहे. अशा गंभीर समस्या सोडवण्याऐवजी सत्ताधारी आणि विरोधक केवळ कुरघोड्यांच्या राजकारणात मग्न आहेत, असा आरोप जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांनी केला आहे.

दोषींवर कारवाईची मागणी

दुरुस्तीच्या नावाखाली हा दवाखाना जमीनदोस्त करण्याचे आदेश देणाऱ्यांवर प्रांताधिकाऱ्यांनी चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

आंदोलनाचा इशारा: > "प्रशासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करून दवाखाना सध्याच्याच ठिकाणी सुरू ठेवावा. जर प्रशासनाने जनभावनेचा आदर केला नाही, तर रिपब्लिकन सेना नागरिकांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडेल," असा इशारा विनोद सोनवणे (जिल्हाध्यक्ष), दिनेश इखारे (जिल्हा नेते),वंदनाताई सोनवणे महिला सेना जिल्हाध्यक्षा यांनी प्रशासनाला दिला आहे.

यावेळी वंदनाताई आराक जिल्हा महासचिव, देवदत्त मकासरे मेजर जिल्हा उपाध्यक्ष,बंटी नरवाडे, सुनंदा मोरे, दिलीप भालेराव,वर्षा सपकाळे,मिना भालेराव, स्वप्नील सोनवणे,अक्षय सोनवणे, मयुर नरवाडे

No comments:

Post a Comment