जिल्हा प्रतिनिधी/ जळगाव
बोदवड तालुक्यातील चिखली शेवगा वळजी या गावाला जाण्यासाठी हा रस्ता पुढे माळेगाव निपाणा मार्गे बुलढाणा किंवा मलकापूर जाण्यासाठी महत्त्वाचा रस्ता आहे
परंतु थेट बोदवड मलकापूर रोड सोडला म्हणजे या रस्त्याने चिखली गावापर्यंत खूप खड्डेमय झाला असून शेतकऱ्यांना आपला शेतीमाल विकण्यासाठी व जाण्यासाठी व येण्यासाठी शाळकरी मुलांना मुलींना शाळेत जाण्यासाठी येण्यासाठी व नागरिकांना वैद्यकीय उपचार घेण्यासाठी किंवा इतर महत्त्वाच्या कामांसाठी नेहमी प्रवास करावा लागतो
किमान गेली बरेच वर्षे झाले या रस्त्याने जाताना येताना भरपूर अपघात झालेले आहे व अपघाताची मालिका सुरूच आहे आतापर्यंत या या रस्त्यातील मोठे मोठे खड्डे मुरमा ने सुद्धा बुजलेले नाही वाहनधारकांना आपली वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागते
असे प्रकार वर्षानुवर्षे सुरू आहे यासाठी भ्रष्टाचार विरोधी आक्रोश महाराष्ट्र राज्य भारत सरकार मान्यता प्राप्त या संघटनेच्या वतीने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल भाऊ व्हानमारे साहेब व महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष शेख गुलाब मामू यांच्या मार्गदर्शनाने जिल्हाध्यक्ष रामेश्वर लोहार यांनी व जिल्हा कार्यकारणी सदस्य व जिल्हा अधिकारी साहेब यांना तक्रार रुपी निवेदन दिले निवेदनामध्ये असे सांगितले आहे ते येणाऱ्या एक महिन्याच्या आत जर या रस्त्याचे काम सुरू नाही झाले तर संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल खानदेश आणि विदर्भ याला जोडणारा महत्त्वाचा रस्ता असून आतापर्यंत या रस्त्याचे काम झालेच नाही जे अधिकारी व कर्मचारी याकडे मुद्दाम डोळे झाक करत असतील अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्वरित रस्त्याचे काम सुरू व्हावे असे यात म्हटले आहे व बोदवड येथील शेतकरी संघटनेचे सुवर्णसिंग पाटील यांनी सुद्धा हा मुद्दा जनतेच्या लक्षात आणला असून आतापर्यंत बऱ्याच वेळा अधिकाऱ्यांना सूचना निदर्शनात आणून देऊन सुद्धा हे काम झालेले नाही तरी त्वरित काम सुरू करावे अन्यथा भ्रष्टाचार विरोधी आक्रोश महाराष्ट्र राज्य भारत सरकार मान्यता प्राप्त या संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असे जिल्हाध्यक्ष रामेश्वर लोहार यांनी कळवले आहे


No comments:
Post a Comment