बोदवड तालुक्यातील मुक्तळ येथे आजपासून नाट्य परंपरा उत्सव सुरू. - MHL News

Breaking

Saturday, 28 March 2026

बोदवड तालुक्यातील मुक्तळ येथे आजपासून नाट्य परंपरा उत्सव सुरू.

 



महा लोकसंवाद न्यूज 

उपसंपादक/ रामेश्वर लोहार 

 

बोदवड येथुन अवघ्या बारा किमी अंतरावर असलेल्या बोदवड तालुक्यातील मुक्तळ गावातील गाव पातळीवर श्रीराम प्रसारित संगीत नाट्य मंडळ गेली शंभर वर्ष होऊन जुनी परंपरा आजच्या एकविसाव्या शतकात सुद्धा टिकून आहे.आजच्या आधुनिक युगात रामनवमी ते हनुमान जयंती व नृसिंह अवताराच्या सोगाने सांगता चैत्रशुद्ध नवमी

श्री. रामजन्मोत्सव चेत्र शुद्ध दशमी श्रीरामाची पालखी चैत्रशुद्ध एकादशी ते चैत्रशुद्ध चतुर्थी पर्यंत चार दिवसात कौटुंबिक पौराणिक व सामाजिक नाटके सादर केली जातात.


चैत्रशुद्ध चतुर्थीला सकाळी सहा वाजता नर्सरी अवताराचे सोग व सायंकाळी दहीहंडी तथा दिंडी सोहळ्याने आज ही मुक्तळ गाव दनानते व हनुमान यांच्या पालखी प्रदक्षिणेने सोहळ्याचा समारोप होतो. 

पूर्वी या महोत्सवात रावणाचे विविध राक्षसांचे राम सीता ब्रह्मा विष्णू महेश यांच्यासह विविध देवदेवतांचे सोंग काढून सहा दिवस हा उत्सव साजरा केला जात होता.


परंतु सन 1940 पासून त्यात बदल करून सोगा ऐवजी चार दिवस वेगवेगळ्या नाटकांच्या माध्यमातून बदल करून लोकांना या नाटकातून संदेश देण्याची प्रथा सुरू झाली दरवर्षी रामनवमी ते हनुमान जयंती दरम्यान श्रीराम प्रसादिक संघनाट्य मंडळातर्फे नाट्य सादर केली जातात यात गावातील वृद्ध व तरूण आपल्या कलागुणांचे सादरीकरण करतात या नाट्य मंडळाजवळ स्वतःचे साहित्य नसल्याने गावातून कपडे दागदागिने साहित्य जमा करून नाटके पूर्ण केली जातात ग्राम ग्रामीण भागाची सांस्कृतिक ओळख म्हणजे भजन कीर्तन व लोकनाट्य एवढ्यावरच मर्यादित असल्याचा समज जळगाव जिल्ह्यातील मुक्तळ व शेलवड या दोन गावांनी अपवाद ठरविला आहे मुक्तळ गावात राम जन्मोत्सव नाट्य सादर करून नाटकाला जिवंत ठेवणारे हे छोटेसे गाव आहे 1940 पासून फक्त कोरोना काळ वगळता आतापर्यंत खंड न पडता उत्सव सुरूच राहिला आहे कुणाकडे मृत्यू झाल्यास मृतदेह घरात ठेवून उत्सव पूर्ण केल्याच्या घटना देखील घडले आहेत येथील प्रभाकर गोपाळ जोशी उर्फ बाळू यांनी श्रीराम प्रसादिक नाट्य मंडळाची स्थापना करून गावातील उत्साही कलाकारांना सोबत घेऊन गावात नाट्य सादर करण्याचे कार्य सुरू ठेवले नाटकासाठी लागणाऱ्या रंगमंचाची त्यांनी स्वतः जागा उपलब्ध करून दिली आहे उत्साहात सोंगाची निर्मिती व सजावट तुकाराम वराडे हे हयात होते तो पर्यंत करत होते पण आता नंतर त्यांच्या पश्चात रामेश्वर लोहार हे नृसिंह अवताराच्या सोगाची सजावट करतात 


यावर्षी रविवारी ठीक नऊ दिनांक वाजता रात्री दुश्मन. 

सोमवारी ठीक रात्री नऊ वाजता सवाल कुंकवाचा व मंगळवारी रात्री नऊ वाजता राजकारणात रंगली ग्रामपंचायत व बुधवारी ठीक नऊ वाजता रात्री माहेरची ओटी ही नाट्य सादरीकरण करण्याचे ठरवले आहे सर्व पात्र व भूमिका पुरुष व गावातील नागरिक एकही पैसा न घेता स्वतः वर्गणी देऊन कामे करतात व उत्साह यासह नाट्य सादर करण्याची परंपरा टिकण्यासाठी सर्वांची प्रयत्न सुरू असतात एकोप्याच्या भावनेमुळे आतापर्यंत उत्साहाला व या श्रीराम प्रसारित संगीत नाट्य मंडळ याला कोणतेही गालबोट लागलेले नाही देवाची कृपा व दिलेली भूमिका कशी पार पाडावी व या भूमिकाला पत्राला कसा रंग देता येईल व सादरीकरण किती उत्साहात सादर होईल याकडे सर्वांचे लक्ष असते 


पूर्वी ज्यांचे वडील नाटकांमध्ये काम करत होते आता त्यांचे मुले व नातवंडे या नाटकांमध्ये कामे करतात व आपली परंपरा जोपासतात व नाट्यकला जिवंत ठेवीत आहे या कंपनीचे मॅनेजर डॉक्टर ब्रिजलाल भवरलाल जैन यांचे सहकार्य मिळत असून ते स्वतः नाटकात काम करतात कंपनीची व्यवस्थापक असून त्यांच्यासह रामदास पाटील सुनील पाटील सुरेश पाटील विठ्ठल पवार रुपेश पाटील व गावातील युवा वर्ग या महोत्सवात यशस्वी ते साठी निरंतर परिश्रम घेत आहेत या महोत्सवाचे ग्रामीण रंगात सादरीकरण असल्याने आपली शेती मजुरीच काम धंदा व घराच्या जबाबदाऱ्या सांभाळून येथील कलाकार नाट्यकलेला वेळ देत आहे कलाकारांचा मेकअप रामदास पाटील व कंपनीची जुनी सदस्य करतात संगीताची सात गावातील भजनी मंडळाकडून मिळते नरसिंह अवताराचे सोग पूर्वी आत्माराम ज्ञानोबा पवार घेत होते परंतु वयोवृद्ध झाल्यामुळे आता विठ्ठल रामा पवार हे घेतात व सोगाची सजावट रामेश्वर लोहार हे करतात कागदाच्या भल्या मोठ्या खांबातून हरिनारायण धाव या घोषणांनी गरजेनून भले मोठे नरसिंह उताराचे सॉंग बाहेर पडते व 100 ते 200 फुटाच्या पावली खेळत हरि नारायणगाव या घोषणाच्या आवाजाच्या डपाच्या तालावर पाऊली झाल्यानंतर सोंग शांत होते सायंकाळी दहीहंडीचा कार्यक्रम होऊन हनुमंताच्या पालखीची ग्रामपंचायत होऊन सहा दिवसीय उत्सवाचा समारोप होतो या संवाद जुनी कंपनीचे सदस्य व आता आयात सर्व जुनी कंपनी यांच्यासह जुने बाळू बुवा भवरालाल जैन मनोहर लोहार शामराव टेलर तुकाराम टेलर भाऊराव पाटील राजाराम पाटील राजू सोनवणे किटकुल धनगर देवराम कापसे दिनकर मतकर कंपनीचे व्यवस्थापक यांनी सर्वांनी त्या काळापासून टिकून ठेवलेल्या उत्सवाची हाताची हयात व कंपनीचे सर्व सदस्य मेहनत घेऊन पार पाडण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहतात त्या काळामध्ये कंपनीकडून आजवर सादर केलेले नाट्य तंट्या भिल दिवाजळो सारी रात सोन्याची द्वारका संत तुकाराम गड आला पण सिंह गेला सैतान दैव सामील मृत्यूला देव जाणिले कुणी सिंहाचा छावा राजा हरिश्चंद्र तारामती सतीचा श्राप शापित गाव यासारखी प्रख्यात नाटके सादर केली आहे तरी आता या सर्व श्रीराम प्रसादिक संगीत नाट्य मंडळाचे सदस्य उत्सव पूर्ण होण्यासाठी व चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी नेहमी मेहनत घेऊन श्रीराम जन्मोत्सव ते हनुमान जयंती या काळात प्रयत्न करत असतात 


जळगाव जिल्ह्यातील इतर गावांमध्ये तमाशा व इतर कार्यक्रम सादर करून उत्सव बनवतात परंतु जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील मुक्तळ येथे नाट्य सादर करून ही वेगळी परंपरा हे गाव जपत आहे

No comments:

Post a Comment