म्हाडा कॉलनी मलकापूर येथे भिम जयंती उत्साहात साजरी - MHL News

Breaking

Thursday, 16 April 2026

म्हाडा कॉलनी मलकापूर येथे भिम जयंती उत्साहात साजरी

 


महा.लोकसंवाद न्यूज 

प्रतिनिधी/मलकापूर 


दि.14 एप्रिल रोजी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हाडा कॉलनी मलकापूर येथे साजरी करण्यात आली 


सविस्तर बातमी अशी.मलकापुर येथे म्हाडा कॉलनी मध्ये वंचित बहुजन महीला तालुका अध्यक्षा पोर्णिमा इंगळे यांच्या नेतृत्वाखाली साजरी करण्यात आली 


या वेळी येथील काही जातीय वादी लोकांचा जयंती साजरी करण्यास विरोध असतानाही पौर्णिमा इंगळे यांनी पोलिस संरक्षणात जयंती साजरी केली सर्व प्रथम पौर्णिमा इंगळे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच येथील नगरसेवक दुर्गेश भाऊ यांनी सुध्दा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले या वेळी येथे मोठ्या प्रमाणावर समाज बांधव उपस्थित होते तसेच वंचित बहुजन आघाडी चे अतिष भाई खराटे जिल्हा महासचिव यशवंत कळासे जिल्हा उपाध्यक्ष गजानन झनके नाना इंगळे रमाबाई होळेकर म्हाडा कॉलनी मधील समाज बांधव उपस्थित होते 

यावेळी कार्यक्रम पोलिस बंदोबस्तात उत्साहात पार पडला

No comments:

Post a Comment