नरसापुर येथील अल्पवयीन बालिका अत्याचार प्रकरणी आरोपीला कठोरात कठोर फाशीची शिक्षा व्हावी - MHL News

Breaking

Wednesday, 6 May 2026

नरसापुर येथील अल्पवयीन बालिका अत्याचार प्रकरणी आरोपीला कठोरात कठोर फाशीची शिक्षा व्हावी

 


वंचित बहुजन महिला आघाडीचे राज्यपाल यांना निवेदन 


महा लोकसंवाद न्यूज 

प्रतिनिधी.मलकापूर 


नरसापुर तालुका भोर जिल्हा पुणे येथील एका साडेतीन वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला दगडाने ठेचून मारून टाकले व तिचा मृतदेह शेनाच्या ढिगार्‍याखाली दाबून ठेवला. ही घटना अत्यंत संताप जनक असून मानवतेला काळीमा फासणारी आहे 

अशा कृतीला समाजात अजिबात थारा नाही आरोपी हा आरोपीस असतो त्याला कोणतेही प्रकारची जात नसते 


या घटनेतील आरोपी भीमराव कांबळे याच्यावर कोणत्याही प्रकारची दयामया न दाखवता पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करून हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फोटो शिक्षा म्हणजेच फाशीची शिक्षा देण्यात यावी महिलांच्या मानसन्मानावर घाला घालणाऱ्या नराधमांना कुठलीही सूट न देता या प्रकरणात कुठल्याही खलबलचिनीपणा जनता सहन करणार नाही आणि यापुढे कोणताच गुन्हेगार अशी हिम्मत करणार नाही याची खात्री प्रशासनाने घ्यावी

नरसापुर अत्याचाराचा आम्ही जाहीर निषेध करतो 

अशा प्रकारचे निवेदन मलकापूर येथील तहसीलदारांन मार्फत महामहीम राज्यपाल यांना देण्यात आले यावेळी निवेदन देताना वंचित बहुजन महिला तालुकाध्यक्ष पौर्णिमा इंगळे उपाध्यक्ष रमा होळकर दीपमाला इंगळे भाऊराव उमाळे गजानन झणके नाना इंगळे व सर्व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते हजर होते

No comments:

Post a Comment