महा लोकसंवाद न्यूज
जिल्हा प्रतिनिधी/जळगाव
दि. 20जून 2026 शनिवार रोजी. शैक्षणिक वर्ष 2026/27 रोजी किड्स झोन प्रि स्कूल राज प्राथमिक माध्यमिक व डॉक्टर सुनील भाऊ महाजन जुनिअर कॉलेज मेहरून येथे स्कूलपालक सभा संपन्न झाली
तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी महापौर सौ.जयश्रीताई महाजन यांनी भूषवले तसेच नवीन शैक्षणिक वर्ष 2026/27 नवीन अभ्यासक्रमावर पालकांना मार्गदर्शन केले. तसेच पहिली ते चौथी या वर्गांना Computer व सायन्स (इंग्रजी माध्यम) हे दोन विषय ॲड करण्यात आले. तसेच इयत्ता 1ली ते 4थी वर्गशिक्षक निहाय श्री. ज्ञानचंद बऱ्हाटे सर , श्री. संदीप खंडारे सर, श्री. केतन बऱ्हाटे सर, सौ. सीमा ताडे मॅडम यांनी वर्ग निहाय पालकांना मार्गदर्शन केले
प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री.चंद्रकांत पाटील सर यांनी प्रास्ताविक केले. व आभार मानले
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन व सर्वांचे अनमोल सहकार्य लाभले.

No comments:
Post a Comment