मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी कारवाई ची मागणी - MHL News

Breaking

Thursday, 25 June 2026

मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी कारवाई ची मागणी

 



महा लोकसंवाद न्यूज 

प्रतिनिधी/बोदवड


आज दि.25 जुन रोजी मुस्लिम सेवा संघ तालुका बोदवड यांच्या तर्फे बोदवड तहसीलदार यांना निवेदनाद्वारे केली मागणी 


सविस्तर माहितीसाठी अशी आहे की बोदवड येथील नाजीया इलाहीखान या महिलेने सोशल मीडियावर धार्मिक भावना दुखावणारे व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी त्यांच्यावर कायदेशीर कठोर कारवाई करावी अशी मागणी मुस्लिम सेवासंघ यांच्याकडून करण्यात आली 


नाजीया इलाहीखान या महीलेने 

मुस्लिम समाजा चे पैगंबर हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या बद्दल सामाजिक माध्यमांवर अपमानजनक आणि वाईट व्हिडिओ व्हायरल करुन समस्त मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याने मुस्लिम सेवा संघ यांच्या तर्फे बोदवड येथील तहसीलदार यांना निवेदन देऊन कडक कारवाईची मागणी करण्यात आली 


यावेळी निवेदन देतांना मुस्लिम सेवा संघाचे बोदवड तालुका अध्यक्ष शे.अकरम शे इब्राहिम महासेन सुरडकर राजेश बोदडे अख्तर ईसा पिंजारी रमेश नारायण इंगळे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते

No comments:

Post a Comment