संस्कृती माध्यमिक विद्यालयात राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी - MHL News

Breaking

Friday, 26 June 2026

संस्कृती माध्यमिक विद्यालयात राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी

 



महा.लोकसंवाद न्यूज 

जिल्हा प्रतिनिधी/जळगाव 


संस्कृती माध्यमिक विद्यालय, मेहरून परिसर, जळगाव येथे आज दिनांक 26 जुन रोजी राजर्षी शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.


कार्यक्रमाच्या प्रारंभी राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर उपस्थितांनी प्रतिमेस अभिवादन करून आदरांजली वाहिली.


यावेळी राजर्षी शाहू महाराज यांनी शिक्षणाचा प्रसार, सामाजिक समता आणि सर्वसामान्यांच्या उन्नतीसाठी केलेल्या कार्याचा गौरव करण्यात आला. त्यांच्या विचारांचे स्मरण करून समाजहितासाठी कार्य करण्याचा संदेश देण्यात आला.


या कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


राजर्षी शाहू महाराज यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन! करण्यात आले

No comments:

Post a Comment